Nari Shakti Doot App – लाडकी बहीण योजना – Apply Online

नारी शक्ती दूत हा भारत सरकारचा विशेषत: ग्रामीण भागात महिलांचे सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक कार्यक्रम आहे. “Nari Shakti Doot” म्हणजे “स्त्री शक्तीची राजदूत.” या राजदूत स्थानिक महिला आहेत ज्यांना इतर महिलांना सरकारी कार्यक्रम, आरोग्य, शिक्षण आणि त्यांच्या कायदेशीर अधिकारांबद्दल माहिती देण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. जाणकार आणि सशक्त महिलांचे नेटवर्क तयार करणे हा यामागचा उद्देश आहे जे त्यांच्या समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतील.

सध्या महाराष्ट्र सरकारने चालू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची सुविधा Nari Shakti Doot App वर उपलब्ध आहे. या App वर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरू शकता, अर्जाची स्थिती तपासू शकता.

योजनेचा लाभ
पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये वर्षाला १८००० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात देण्यात येईल.

Important Dates

अर्ज भरण्यास सुरूवात >>१ जुलै २०२४
अंतिम तारीख >>१५ ऑक्टोबर २०२४

पात्रता

  •  महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • कमीत कमी वय २१ वर्षे पूर्ण व जास्तीत जास्त ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

अपात्रता

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/– किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी राशन कार्ड
  • अर्जदाराचे हमीपत्र
  • बँक पासबुक
  • महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे (पतीचे अधिवास प्रमाणपत्र / 15 वर्षापूर्वीचे राशनकार्ड / मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला)
  • अर्जदाराचा फोटो

नारी शक्ती अँप वर Ladki Bahin Yojana साठी अर्ज करा

  • लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी Nari Shakti Doot अँप Open करा त्यानंतर मोबाइल नंबर टाकून Login करून घ्या.
  • लॉगिन केल्यावर आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या लिंक वर क्लिक करून आपली Profile पूर्ण करा.

  • आपले पूर्ण नाव ई-मेल आयडी जिल्हा, आणि नारीशक्ती प्राधिकृत प्रकार निवडून प्रोफाइल अपडेट करा.

  • त्यानंतर होमपेज वर येऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लिंक वर क्लिक करा. यानंतर सूचनांचे पालन करून अर्ज काळजीपूर्वक भर आणि कागदपत्रे अपलोड करून फॉर्म Submit करा.